IND vs SA : हार्दिकचं विक्रमी अर्धशतक अन् गर्लफ्रेंड माहिकाला फ्लाईंग किस, VIDEO होतोय व्हायरल

Hardik Pandya flying kiss to Mahieka Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या बॅटने मैदानात आग लावली. अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक झळकावत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याने या विक्रमी अर्धशतकानंतर केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
फ्लाईंग किस सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल –
हार्दिकच्या या खेळीइतकीच चर्चा त्याच्या सेलिब्रेशनची रंगली आहे. हार्दिकचे हे अर्धशतक पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा स्टँड्समध्ये उपस्थित होती. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हार्दिकने बॅट हवेत उंचावली आणि महिकाच्या दिशेने पाहत ‘फ्लाईंग किस’ दिला. या विशेष सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये याचीच चर्चा सुरू आहे.
Hardik Pandya And Mahieka Sharma 🔥#INDvSA pic.twitter.com/vCLuRKu74k
— ` (@washaterx) December 19, 2025
युवराज सिंगनंतरचे सर्वात वेगवान अर्धशतक –
कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. पंड्याने अवघ्या ७ चेंडूंत ३१ धावा कुटल्या आणि त्यानंतर १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने झळकावलेले दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. या यादीत आजही युवराज सिंग (१२ चेंडू) पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिकने ६३ धावांची स्फोटक खेळी करत भारताला विशाल धावसंख्या उभारून दिली.
हेही वाचा – IND vs SA : सॅमसनचा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये केला खास पराक्रम; विराट-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री
भारताने उभारला २३१ धावांचा डोंगर –
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ७३ धावा केल्या, तर संजू सॅमसन (३७) आणि अभिषेक शर्मा (३४) यांनी चांगली सुरुवात करून दिली. हार्दिकच्या ६३ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत २३१ धावांचा विशाल डोंगर उभा केला.





