Team India Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; हरमनप्रीत कौरकडे धुरा, ‘या’ युवा खेळाडूची एन्ट्री!
Team India Announce : मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Team India Announce for Womens T20 WC 2026 : आगामी आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयने २ मे रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावल्यानंतर आता टीम इंडियाचे लक्ष आपल्या पहिल्या टी-२० विश्वचषकावर आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली असून, हरमनप्रीत कौरकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर, स्मृती मानधना उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
नंदनी शर्माची प्रथमच निवड (Team India Announce)
या संघात २४ वर्षीय वेगवान गोलंदाज नंदनी शर्माला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तिने डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना १७ विकेट्स घेत संयुक्त सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तसेच, यास्तिका भाटिया आणि राधा यादव यांचे संघात पुनरागमन झाले असून अनुष्का शर्मा, उमा छेत्री आणि काशवी गौतम यांना संघात स्थान मिळालेले नाही.
Mark your calendars 🗓️
#TeamIndia‘s squad announcement for the ICC Women’s #T20WorldCup 2⃣0⃣2⃣6⃣ coming your way this Saturday 🤩 🇮🇳 pic.twitter.com/jVARcIdNlk— BCCI Women (@BCCIWomen) April 29, 2026
विश्वचषकाचे वेळापत्रक आणि गट –
या वर्षीच्या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत, ज्यांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. भारताचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला असून, त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि बांगलादेश हे संघ आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी-२० विश्वचषक २०२६ साठीचे वेळापत्रक : Team India Announce
- १४ जून, २०२६: भारत विरुद्ध पाकिस्तान, बर्मिंगहॅम
- १७ जून, २०२६: भारत विरुद्ध नेदरलँड्स, लीड्स
- २१ जून, २०२६: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर
- २५ जून, २०२६: भारत विरुद्ध बांगलादेश, मँचेस्टर
- २८ जून, २०२६: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लंडन (लॉर्ड्स)
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, ऋचा घोष, अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांति गौड, श्री चरणी, श्रेयंका पाटिल, भारती फुलमाली, यास्तिका भाटिया, नंदनी शर्मा आणि राधा यादव.





