Jos Buttler Statement : “माझा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ फक्त वैभवच मोडू शकतो…”, ऐतिहासिक कामगिरीनंतर जोस बटलरचं मोठं विधान
Jos Buttler Statement : जोस बटलरने क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

Jos Buttler Becomes Highest Run Scorer In T20 Cricket : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने टी-२० क्रिकेटच्या जगतात एक नवा इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम (World Record) आता इंग्लिश स्टारच्या नावावर नोंदवला गेला आहे. ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्स आणि वेल्श फायर यांच्यातील सामन्यादरम्यान बटलरने वेस्ट इंडिजचा माजी धुरंधर अष्टपैलू किरॉन पोलार्डला मागे टाकत ही ऐतिहासिक कामगिरी केली. यानंतर त्याने वैभव सूर्यवंशीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.
२० चेंडूंत ५१ धावा अन् ख्रिस गेलचाही विक्रम केला उद्धवस्त!
या सामन्यात जोस बटलरने अवघ्या २० चेंडूंत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची वादळी खेळी केली. या तुफानी खेळीसह बटलरच्या नावे आता ५२२ टी-२० सामन्यांत १४,८३३ धावा जमा झाल्या आहेत, ज्यामध्ये ९ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीसह त्याने किरॉन पोलार्ड (१४,८०३ धावा) आणि दीर्घकाळ अव्वल स्थानावर राज्य करणाऱ्या ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल (१४,५६२ धावा) या दोघांनाही पछाडले आहे.
JOS BUTTLER SMASHED FIFTY IN JUST 20 BALLS v WELSH FIRE.
– Blistering innings from Jos The Boss!🔥 pic.twitter.com/qZcWZtLMs8
— Maina Singh (@Maina_Singhx77) August 5, 2026
“माझा हा विक्रम ‘हा’ १५ वर्षीय भारतीय खेळाडू मोडू शकतो!”
Jos Buttler on becoming the player with most T20 runs 🗣️
It’s really cool to think you’ve got the most T20 runs out of anyone. Someone will surpass it one day, the name’s probably Sooryavanshi!#TheHundred #JosButtler
pic.twitter.com/cBtLv0vitl— CREX (@Crex_live) August 5, 2026
या ऐतिहासिक विक्रमानंतर ‘स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना जोस बटलरने भारताच्या १५ वर्षीय नवोदित स्टार वैभव सूर्यवंशीचे (Vaibhav Suryavanshi) विशेष कौतुक केले. तो म्हणाला, “सर्वोच्च स्थानी पोहोचणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण हा विक्रम एक दिवस नक्कीच मोडला जाईल आणि कदाचित भारताचा वैभव सूर्यवंशी हा विक्रम मोडू शकतो.”
आपल्या फॉर्मबद्दल भाष्य करताना बटलर म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी मी अत्यंत खराब फॉर्ममधून जात होतो. अशा वेळी तुमच्याकडे दोनच पर्याय असतात – हार मानणे किंवा पुन्हा उभे राहून लढणे. मी लढण्याचा मार्ग निवडला आणि आज मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी करत आहे.”




