RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक विजय! राहुल-निसांकाच्या वादळी खेळीपुढे राजस्थानचे गोलंदाज निष्प्रभ
RR vs DC : आयपीएलच्या इतिहासातील हा दिल्लीचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.

RR vs DC Delhi Capitals beat Rajasthan Royals : आयपीएल २०२६ च्या ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवताना राजस्थानवर ७ विकेट्सनी शानदार विजय मिळवला आहे. जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने राजस्थान रॉयल्सने दिलेले २२६ धावांचे महाकाय लक्ष्य १९.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आयपीएलच्या इतिहासातील हा दिल्लीचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
रियान पराग आणि फरेराचा धमाका –
राजस्थ्यानच्या डावाची सुरुवात करताना यशस्वी जैस्वालने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, मात्र तो व वैभव सूर्यवंशी लवकरच बाद झाले. त्यानंतर कर्णधार रियान परागने ध्रुव जुरेल (४२) सोबत १०२ धावांची दमदार भागीदारी करत डावाला आकार दिला. पराग शतकाजवळ पोहोचला असताना ९० धावांवर बाद झाला. अखेरीस डॉनोव्हन फरेरा याने अवघ्या १४ चेंडूंत नाबाद ४७ धावांची तुफानी खेळी करत संघाला २२५ पर्यंत पोहोचवले. दिल्लीसाठी पुनरागमन करणाऱ्या मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या.
BACK TO WINNING WAYS! 😌@delhicapitals register their biggest #TATAIPL chase to claim much-needed 2️⃣ points 👌
Scorecard ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/icV06oJp1K
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
निसांका आणि राहुलचा वादळी प्रत्युत्तर –
First #TATAIPL Fifty 🤩
Pathum Nissanka goes past the 40s huddle in style, scoring a 23-ball half-century 🙌
Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/E35I1RTMdC
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
प्रत्युत्तरात २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीवीरांनी वादळी सुरुवात केली. पथुम निसांका (६२ धावा, २३ चेंडू) आणि के. एल. राहुल (७५ धावा, २७ चेंडू) यांनी पहिल्या ९.३ षटकांतच १११ धावांची विक्रमी भागीदारी रचली. दोघांनीही झटपट अर्धशतके पूर्ण करून राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
मधल्या फळीत नीतीश राणाने ३३ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्स (१८*) आणि आशुतोष शर्मा (२५*) यांनी धडाकेबाज भागीदारी करून संघाला १९.१ षटकांत विजयापर्यंत पोहोचवले. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील चौथा विजय नोंदवला आहे.





