Mitchell Santner Injury : मुंबई इंडियन्सला मोठा झटका! स्टार अष्टपैलू खेळाडू IPL मधून बाहेर; ‘या’ फिरकीपटूची संघात अचानक एन्ट्री
Mitchell Santner Injury : मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Mitchell Santner ruled out Keshav Maharaj MI : आयपीएल २०२६ चा हंगाम निर्णायक वळणावर असताना मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी फिरकीपटूची संघात एन्ट्री झाली आहे.
पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. अष्टपैलू कामगिरीने संघाचा समतोल राखणारा न्यूझीलंडचा मिचेल सँटनर खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या घरच्या मैदानातील सामन्यात बाउंड्रीवर झेल पकडताना सँटनरच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती.
Wishing you a speedy recovery, Mitch! 💙 pic.twitter.com/1M36hlUhjo
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2026
केशव महाराज आता मुंबईच्या ताफ्यात –
Welcome Keshav Maharaj pic.twitter.com/vjQ8MpAUtR
— Cricket Cabin 🏪 (@Cricket_Cabin) April 27, 2026
सँटनरच्या जागी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डावखुरा फिरकीपटू केशव महाराज याला करारबद्ध केले आहे. २७ एप्रिल रोजी आयपीएलने अधिकृत निवेदनात या बदलाची पुष्टी केली. आयपीएल २०२६ च्या लिलावात केशव महाराज ‘अनसोल्ड’ राहिला होता, म्हणजेच त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. मात्र, आता मुंबईने त्याला ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
पुन्हा एकदा नशीब उजळलं –
महाराज का स्वागत है। 🙏 pic.twitter.com/HjjSQKYkR1
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2026
केशव महाराजला आयपीएलचा अनुभव आहे. यापूर्वी २०२४ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्या हंगामात त्याने २ सामने खेळत २ विकेट्स मिळवल्या होत्या. सँटनर बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देत होता, त्यामुळे त्याची उणीव भरून काढणे मुंबईसाठी आव्हानात्मक असेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत संघर्ष करत असताना केशव महाराजचा अनुभव त्यांच्या किती कामी येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





