तापसी पन्नू ही बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तापसीकडे अनेक बिग बजेट चित्रपट असून काही चित्रपट रांगेत आहेत. तापसी पन्नू स्टारर मिताली राजच्या बायोपिक “शाबाश मिठ्ठू’ची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
तापसी पन्नू लवकरच “लूप लपेटा’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते. आता तापसीने या चित्रपटाचा टीझर शेअर करत तो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचे सांगितले.
या चित्रपटाचा ऍनिमेटिड टीझर तापसीने शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत तिने लिहिले की, आता वेळ संपत असून धावाची वेळ झाली आहे. आपण सर्वजण हा चित्रपट कधी बघाल, याची मी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही.
आकाश भाटिया द्वारा दिग्दर्शित “लूप लपेटा’ लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तापसी पन्नू अखेरच्या वेळी “रश्मी रॉकेट’मध्ये झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता ती “लूप लपेटा’, “ब्लर’, “शाबाश मिठ्ठू’ यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.