Tanu Jain: UPSC परीक्षेद्वारे अनेकांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. यात काही जण मोठ्याजिद्दीने अभ्यास करत आपले स्वप्न साकार करतात. आज आपण अशाच एका प्रसिद्ध आयएसएस अधिकारी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. हल्ली सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. तर तुम्ही डॉ तनू जैन यांना पाहिले असेल.
तनु जैन ह्या UPSC परीक्षा इच्छूकांना रील आणि लहान व्हिडिओंद्वारे टिप्स देतात. त्यांनी त्यांचे पती वात्सल्य पंडित IAS सोबत अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. मॉक इंटरव्ह्यू पॅनलची (UPSC मॉक इंटरव्ह्यू) महत्त्वाची सदस्य म्हणून त्या ओळखल्या जातात. वात्सल्य पंडित हे स्वतः नागरी सेवेत आहेत. याशिवाय तो मोटिव्हेशनल स्पीकरही आहे.
कोण आहेत तनू जैन?
डॉक्टर तनू जैन दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीतील केंब्रिज शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मेरठच्या सुभारती वैद्यकीय महाविद्यालयामधून बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
तनू जैन यांच्या यूपीएससीच्या परीक्षा प्रवासात अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती. त्यांनी २०१२ मध्ये पहिल्या प्रयत्नात दोन महिन्यांत पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली. पण मुख्य परीक्षेत त्या अपयशी ठरल्या. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे लक्ष्य पूर्ण केले. त्यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये ६४८ वा क्रमांक मिळवला. २०१४ मध्ये त्यांना सशस्त्र दलाच्या मुख्यालय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.
नोकरी सोडून व्यवसायाकडे वाटचाल
सात वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर डॉक्टर तनू जैन यांनी ही नोकरी सोडून पूर्णवेळ व्यावसायिकतेच्या मार्गावर वाटचाल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीत तथास्तु आयसीएस नावाचे आयएएस कोचिंग सेंटर स्थापन केले आहे.
सोशल मीडियावर डॉक्टर तनू जैन खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. त्यांना डॉक्टर, लेखिका, शिक्षक आणि मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखले जाते.
इन्स्टाग्रामवर त्यांचे ९६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना टिप्स देणारे छोटे छोटे व्हिडीओ त्या शेअर करतात. त्यांच्या व्हिडिओला मोठी पसंती देखील मिळते. यासोबतच त्या विद्यार्थांना तयारी करताना भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक आणि नातेसंबंधांचा समतोल राखणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला देखील देतात.