Sunny Leone Viral Admit Card UP Police Recruitment : पोलीस कॉन्स्टेबल भरती दरम्यान एक खळबळजनक प्रकार घडला आहे.यामुळे सर्वसामान्यांसह अनेक अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत. कॉन्स्टेबल भरती परीक्षेदरम्यान ॲडमिट कार्डवरील काही तांत्रिक कारणामुळे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचाच फोटो छापून आला आहे.यूपीतील पोलीस भरतीदरम्यान घडलेल्या या प्रकरणाची सध्या सोशसल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कार्डवर हा बदल घडून आलाय त्याने देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
यूपी पोलिस भरती परीक्षेच्या ॲडमिट कार्डमध्ये सनी लिओनीचे नाव आणि फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या ॲडमिट कार्डचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. | Sunny Leone Viral Admit Card UP Police Recruitment
नोंदणीमध्ये उमेदवाराचा रोल नंबर देखील यावर आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर मूळ परीक्षार्थी उमेदवाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये उमेदवाराने सनी लिओनीचा फोटो त्याच्या ॲडमिट कार्डवर कसा दिसला हे सांगितले आहे. | Sunny Leone Viral Admit Card UP Police Recruitment
व्हायरल झालेले प्रवेशपत्र हे महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावातील रहिवासी धर्मेंद्र कुमार यांचे आहे. या 39 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये या विद्यार्थ्याने सनी लिओनीचा फोटो कसा आला हे स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाला विद्यार्थी ?
व्हिडिओमध्ये जेव्हा त्या व्यक्तीला विचारण्यात आले की, तू सनी लिओनी कसा बनला म्हणजेच तुझ्या नावा आणि फोटोजागी सनी कशी आली ? त्यावर तो विद्यार्थी म्हणाला,सुरुवातीला जेव्हा प्रवेशपत्र काढले होते, तेव्हा त्यावर फक्त त्याचा फोटो होता, पण नंतर ते कसे बदलले हे मला माहित नसल्याचे त्याने स्पष्ट सांगितले.
UP next level 😭
पत्रकार – कैसे सनी लियोनी बन गए आप?🤣 pic.twitter.com/z6lnTLKGJ5— Raja Babu (@GaurangBhardwa1) February 19, 2024
हा व्हिडिओ सोशल मीडियायावर शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, ‘यूपी नेक्स्ट लेव्हल… पत्रकार- तू सनी लिओनी असा झाला ?’ हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. अशा प्रकारे सनीचा फोटो छापून येन हे काही नवीन नाही यापूर्वी देखील एका परीक्षेदरम्यान असा प्रकार घडल्याचे समोर आले होते.