Two Bull Enters in Cricket Ground : सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातून एकापेक्षा एक आश्चर्यकारक आणि मजेदार व्हिडिओ समोर येत असतात. कधीकधी आपल्याला चमकदार क्षेत्ररक्षण, गोलंदाजी किंवा फलंदाजी पाहायला मिळते, तर कधी खराब क्षेत्ररक्षणाचे किंवा विचित्र पद्धतीने खेळतानाचे मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. नुकतेच क्रिकेटच्या मैदानातून असे एक रंजक दृश्य समोर आले आहे. खराब प्रकाश आणि पावसामुळे क्रिकेटचे अनेक सामने थांबलेले तुम्ही पाहिले असतील, पण जेव्हा एखादा बैल क्रिकेटच्या मैदानात शिरतो तेव्हा काय होते, पाहिले आहे का?
नुकताच सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सामन्यादरम्यान एक बैल मैदानात घुसतो. यानंतर संपूर्ण मैदानात भीतीचे वातावरण पसरते. जो-तो बैलापासून बचाव करण्यासाठी इकडे-तिकडे पळत सुटतो.
Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल….
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट X वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका गावात क्रिकेटचा सामना सुरू असताना एक बैल विकेटच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. सगळ्यात आधी तो यष्टिरक्षकाकडे जातो. हे पाहून विकेटकीपर लगेच तिथून पळून जातो.
When the bulls want to play cricket 🐂🏏 pic.twitter.com/SkrM9lbpzU
— Sameer Allana (@HitmanCricket) February 19, 2024
यानंतर, स्ट्रायकर एंडवर उपस्थित असलेला फलंदाज आपली बॅट दाखवून बैलाला हाकलण्याचा प्रयत्न करतो. यामुळे बैलाला राग येतो आणि तो फलंदाजाचा पाठलाग करू लागतो. फलंदाज कसा तरी तिथून पळून जातो. पण वेगाने धावताना बैल अचानक पंच आणि गोलंदाजाकडे वळतो. त्यानंतर दोघेही लगेच मैदान सोडून पळून जातात. अशाप्रकारे बैलाच्या आगमनामुळे मैदानातील बॅट्समनपासून ते अंपायरपर्यंत सगळ्याचीच एकच तारांबळ उडते आणि काही वेळ हा सामना थांबवावा लागतो.
चाहत्यांनी व्हिडिओला दिली आहे खूप पसंती….
When the bulls want to play cricket 🐂🏏 pic.twitter.com/SkrM9lbpzU
— Sameer Allana (@HitmanCricket) February 19, 2024
बैलामुळे सामना थांबल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहते पसंत करत आहेत. हे पाहून चाहते हशा पिकवत आहेत. या व्हिडिओवर चाहते अनेक मनोरंजक प्रतिक्रिया देत आहेत.