Sunil Gavaskar Criticism : ‘त्या खेळाडूंना संघातून काढा…’, IPL 2026 पूर्वी संतप्त सुनील गावस्करांनी फ्रँचायझींना दिला सल्ला, नेमकं कारण काय?
Sunil Gavaskar Criticism : सुनील गावस्कर यांनी परदेशी खेळाडूंवर तीव्र संताप व्यक्त केला असून फ्रँचायझींना अशा खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Sunil Gavaskar Criticism IPL 2026 Foreign Players : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी परदेशी खेळाडूंच्या ‘नखऱ्यांमुळे’ भारतीय क्रिकेट वर्तुळात नवा वाद पेटला आहे. अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अचानक माघार घेतल्याने किंवा उपलब्धतेबाबत अनिश्चितता दर्शवल्याने भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर संतापले असून त्यांनी विदेशी खेळाडूंवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
आता स्पर्धेला काही दिवस उरले असतानाच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांसारख्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण देत सुरुवातीच्या सामन्यांतून माघार घेतली आहे. दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसननेही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या टप्प्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींवर सुनील गावस्कर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून फ्रँचायझींना अशा खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
“भारतीय पाहुणचाराचा गैरफायदा घेऊ नका” – Sunil Gavaskar Criticism
गावस्कर यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, “काही परदेशी खेळाडू विनाकारण किंवा किरकोळ कारणास्तव उपलब्ध राहत नाहीत आणि फ्रँचायझींना गृहीत धरतात. फ्रँचायझी मालक या खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासाचा, प्रवासाचा सर्व खर्च उचलतात. हा भारतीय पाहुणचार आहे, पण काही खेळाडू त्याला आपला हक्क समजून गैरफायदा घेतात. अशा खेळाडूंना संघातून वगळण्याची वेळ आता आली आहे.”
अश्विनचाही पाठिंबा; पगार कपातीची मागणी – Sunil Gavaskar Criticism

Sunil Gavaskar Criticism : ‘त्या खेळाडूंना संघातून काढा.
गावस्कर यांच्या या भूमिकेला भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही पाठिंबा दिला आहे. विशेषतः कॅमेरून ग्रीनसारख्या खेळाडूंना २५.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले जाते, मात्र ते पूर्ण षटके टाकू शकणार आहेत की नाही, याची शाश्वती नसते. अशा वेळी जर खेळाडू पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसेल, तर फ्रँचायझीला त्यांचा पगार कपात करण्याचा कायदेशीर अधिकार असावा, असे मत अश्विनने व्यक्त केले आहे.
विदेशी खेळाडूंच्या या ‘येरे माझ्या मागल्या’ भूमिकेमुळे आयपीएल संघांच्या नियोजनाचा बोजवारा उडत असून, आता बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालक यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





