Player of the Month : ICC कडून भारत-पाकच्या खेळाडूंचा गौरव! फेब्रुवारी महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर कोरलं नाव
Player of the Month : भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांध्ये बाजी मारली आहे.

ICC Player of the Month February 2026 : आयसीसीकडून फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या साहिबझादा फरहानने पुरुष गटात बाजी मारली, तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आपल्या धारदार गोलंदाजीने कांगारूंना नाचवणाऱ्या अरुंधती रेड्डीने महिला गटात हा बहुमान पटकावला आहे.
साहिबझादा फरहान: टी-२० विश्वचषकातील ‘धावांची मशीन’
पाकिस्तानचा संघ जरी सुपर ८ च्या पुढे जाऊ शकला नसला, तरी साहिबझादा फरहानने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ६ डावांमध्ये ७६.६ च्या सरासरीने तब्बल ३८३ धावा कुटल्या. या दरम्यान त्याने २ शतके झळकावली असून १८ षटकार आणि ३७ चौकार ठोकले. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १६० हून अधिक राहिला आहे.
A star performer in India’s milestone series win against Australia has been awarded the ICC Women’s Player of the Month honour for February 2026 🥇
Read more 👉 https://t.co/MHibkQF6a9 pic.twitter.com/dpMduzKAPI
— ICC (@ICC) March 23, 2026
अरुंधती रेड्डी: ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताचा वेगवान मारा –
A star performer in India’s milestone series win against Australia has been awarded the ICC Women’s Player of the Month honour for February 2026 🥇
Read more 👉 https://t.co/MHibkQF6a9 pic.twitter.com/dpMduzKAPI
— ICC (@ICC) March 23, 2026
भारतीय महिला संघाची उजव्या हाताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत अविस्मरणीय कामगिरी केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत तिने एकूण ८ विकेट्स घेतले. सिडनी टी-२० सामन्यात तिने केवळ २२ धावा देऊन ४ फलंदाजांना बाद केले होते, ज्यामुळे भारतीय संघाला मोलाची मदत झाली.
पुरस्कारावर भारतीयांचे वर्चस्व –
आयसीसीच्या या पुरस्कारावर आतापर्यंत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल याने सर्वाधिक ४ वेळा हा पुरस्कार जिंकून जागतिक विक्रम केला आहे. त्याने २०२३ आणि २०२५ मध्ये प्रत्येकी दोनदा हा बहुमान मिळवला. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी २-२ वेळा, तर पाकिस्तानच्या बाबर आझमने ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.





