IPL 2024 : सुनील गावस्करांनी ऋषभ पंतबद्दल व्यक्त केली चिंता, म्हणाले ” त्याला फलंदाजीत लय…”

Sunil Gavaskar on Rishabh Pant in IPL 2024 : आयपीएल 2024 मधून ऋषभ पंतच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबर 2022 मध्ये, ऋषभ पंत एका कार अपघाताचा बळी ठरला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. 14 महिन्यांच्या पुनर्वसनानंतर ( after rehabilitation) पंत आयपीएल 2024 मधून पुनरागमन करणार आहे.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांंनी ऋषभ पंतबद्दल चिंता व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्ट्सवर याबद्दल बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “ ऋषभ पंतला फलंदाजीत लय ( Fluency ) मिळवणे थोडे कठीण जाणार आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे तो (पंत) काही क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याचा थोडा सराव झाला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “पंतने जरी कसून सराव केला असला तरी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिल्याने त्याला सुरुवातीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे गावस्करांनी मत मांडले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-rcb-prize-money-money-rained-on-champion-royal-challengers-bangalore/
ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही गुडघ्याच्या दुखापतींबद्दल बोलता तेव्हा तो ट्विस्ट असतो. विकेटकीपिंग अवघड आहे, पण फलंदाजीतही गुडघे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, कदाचित, सुरुवातीला, आम्हाला खरा ऋषभ पंत पाहायला मिळणार नाही ज्याची आम्हाला सवय झाली आहे.”





