पुणे – प्रियकराने ऑडिओ क्लिपद्वारे धमकी दिल्याने तरुणीने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सासवड रस्ता येथील लॉजवर ही घटना घडली.
या प्रकरणी अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी कोंढवा भागात राहायला होती. अक्षय तिला विवाहासाठी धमकावत होता माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने तिला दिली होती.
त्यासंबंधी एक क्लिप त्याने तिला पाठविली होती. त्यानंतर तरुणीने घाबरून टोकाचे पाऊल उचलले. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.