मुंबई – अपेक्षेप्रमाणे यावर्षी आतापर्यंत झालेल्या साखर उत्पादनात बरीच घट झाली. साखर उत्पादकाच्या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार 15 मार्चपर्यंत देशात 281 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी 15 मार्चपर्यंत देशात 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. (Sugar production decreased this year )
कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर काही साखर उत्पादन करणार्या राज्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे या वर्षी साखरेचे उत्पादन कमी होणार आहे, असे या अगोदरच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हटले होते. आता प्रत्यक्षात आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
देशात साखरेचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होणार असल्यामुळे केंद्र सरकारने अगोदरच मर्यादित साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. सरकारच्या या धोरणात आगामी काळातही फरक पडणार नसल्याचे समजले जात आहे.