सातारा, (प्रतिनिधी) – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. सन 202४-2५ या वर्षांसाठी चेअरमनपदी सुधीर ठोके, सेक्रेटरी हर्षद वालावलकर, व्हाईस चेअरमन श्री. सयाजी भोसले, ट्रेझरर श्री. पृथ्वीराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
त्याचबरोबर अनिल दातीर, सचिन देशमुख व सुधीर घार्गे यांची कौन्सिल मेंबरपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून निलेश पाटील, मंगेश लावंड, सुहास बगाडे, हेमंत कदम, मिलींद वाईकर, विवेक ठोके, शरद जाधव, शंभुराज पाटील, संदीप जाधव, विश्वास नारकर, अजय खटावकर, रणजित ढगे, मंदार खळदकर, शैलेंद्र जगताप, अलिन फडतरे, सचिन राजगे, अधिक जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ रविवार, दि. १४ एप्रिल रोजी विठ्ठल मंगलम या ठिकाणी रंगारंग कार्यक्रमांनी होणार असून नवनिर्वाचीत चेअरमन सुधीर ठोके व त्यांच्या टिमला मावळते चेअरमन अनिल दातीर व सेक्रेटरी कौस्तुभ मोरे पदाची सूत्रे प्रदान करतील.
या पदग्रहण सोहळयाला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट आनंद गुप्ता, बीएआयचे स्टेट चेअरमन अनिल सोनावणे, बीएआय माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, कालिका स्टीलचे संचालक अनिल गोयल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1941 सालापासून कार्यरत असलेली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था देशभरात बांधकाम व्यावसायिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा देशपातळीवरील संस्थेमधील बीएआय सातारा सेंटर हे एक उत्कृष्ठ ऍक्टिव्ह सेंटर म्हणून नावलौकिक राखून आहे. सातारा सेंटरतर्फे दरवर्षी बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुद्धा काही समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात. सातारा सेंटरच्या या नावलौकिकाला साजेसे जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन हे वर्ष पार पाडण्यासाठी मी व माझी टीम नक्कीच प्रयत्न करेल, असा मनोदय नवनिर्वाचित चेअरमन सुधीर ठोके यांनी व्यक्त केला.