Atharva Sudame : सुदामेकडून तो व्हिडिओ डिलीट; दिलिगिरी व्यक्त करत नेमकं काय म्हणाला?

Atharva Sudame : मराठमोळा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे त्याच्या रीलमुळे चर्चेत असतो. त्याने केलेले रील हसवणारे आणि मेसेज देणारे देखील असतात. असाच एक रील त्याने गणेशोत्सवानिमित्त तयार केला होता. मात्र, या रीलमुळे अथर्व वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या रीलला घेऊन त्याच्यावर टीकाही करण्यात आली. सोशल मीडियावरून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. यानंतर आता अथर्व सुदामे याने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवरून अथर्व सुदामे याला धमक्याही देण्यात आल्या होत्या.
काय म्हणाला अथर्व सुदामे?
“नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे…काल मी एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ टाकली होती. ती मी दुपारी डिलीट केली. त्या व्हिडीओमुळे बरेच लोक नाराज झाले आहेत. त्यांना ती व्हिडीओ आवडली नाही आहे. माझा कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असं अर्थवने म्हटलं आहे.
मी आतापर्यंत अनेक असे व्हिडीओ केले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर आहेत. मला असं वाटत नाही की, माझ्याएवढं कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत. त्यामुळे माझ्या मनात कोणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता. तरी तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो. आतापर्यंत तुम्ही जसे माझ्यावर प्रेम केले तसेच करत रहा. ” असं अर्थवने त्याच्या केलेल्या व्हिडीओवरून दिलगिरी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो.
तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता… मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो.
Marathi Reelstar Atharv Sudame posted this video on Instagram and deleted within a couple of hours due to backlash.
Gen Z is being brainwashed by such influencers and the influencers are nurtured and promoted by the language chauvinist lobby.
Beware.pic.twitter.com/lpXmbJUO1l
— पाकीट तज्ञ (@paakittadnya) August 25, 2025
अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. मात्र, आता याच व्हिडिओवरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.
हेही वाचा : पुण्यात टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला भीषण आग; ६० दुचाकी खाक





