“ही मुलगी कोण आहे?”; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा प्रश्न चाहत्यांच्या जिव्हारी; कियारासोबत पोज देताना नेमकं काय घडलं?

Actress Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणीने २०१४ मध्ये फगली चित्रपटातून बॅालीवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जगभरात तिचे लाखों चाहते आहेत. मात्र, नुकताच एका इन्फ्लुएन्सरने कियाराला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. त्याने कियासोबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे इन्फ्लुएन्सर तायो रिक्कीवर अभिनेत्री कियाराचे अडवाणीचे चाहते संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तायो रिक्कीने नुकत्याच एका कार्यक्रमामधील कियारासोबतचा पोज देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्याने “ही मुलगी कोण आहे? हे कोणाला माहिती आहे का?” असे म्हटले. ज्यामुळे त्याने स्वत: कियाराच्या चाहत्यांचा संताप ओढावून घेतला आहे. ‘टिरा’ या ब्रॅंडला प्रोत्साहन देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तायो रिक्की आणि कियारा हे एकमेकांच्या समोसमोर आले होते. पण त्याने तिला ओळखलचं नाही, असे थेट सोशल मीडियावर लिहिल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
तायो रिक्की हा एक ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर, इंस्टाग्राम मॉडेल आणि गायक आहे. तसेच तो एक युट्यूबरसुद्धा आहे. आपल्या गाण्याचे अनेक व्हिडीओ तो युट्यूबद्वारे अपलोड करत असतो. त्याचाही चाहतावर्ग मोठा असून अशातच त्याने कियाराबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे त्याला कियाराच्या चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओखाली कियाराच्या काही चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ती बॅालीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, पण आम्ही तुला ओळखत नाही, अशी कमेंट्स एकाने केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कियाराच्या चाहत्यांकडून रिक्कीवर टीका केली जात आहे. दरम्यान, कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘वॉर २’मधील ग्लॅमरस लूकमुळे बरीच चर्चेत आहे.





