वरकुटे मलवडी,(वार्ताहर) – 2023-24 च्या एनएमएमएस परीक्षेत वरकुटे मलवडी, ता. माण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या 14 विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्नेहल खांडेकर, नवनाथ लोखंडे, दिनेश मिसाळ, प्रणव मिसाळ, सलोनी ठोंबरे, प्रतीक्षा राऊत, आयन ढेरे, अपूर्व पन्हाळे, अफिया रियाज, साक्षी पडळकर, अदित्य आटपाडकर, साक्षी आटपाडकर, अनुश्री रणदिवे, स्नेहल भिसे यांनी या परीक्षेत यश मिळवले.
आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख, सचिव पवार, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.