हडपसर, दि. 4 (प्रतिनिधी) -विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेताना ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल तेच क्षेत्र निवडावे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कलागुणांना वाव दिल्यास चांगली संधी मिळते, असे माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी सांगितले. सीबीएससी दहावी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार वाडकर यांच्या वतीने करण्यात आला.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्कृती अनिल कुमार साठे 97.4 टक्के, तनिष्का जगदाळे 96 टक्के, वाणी गजेंद्र रुद्रा 95.4 टक्के, यशस्वी स्मार्ट 90 टक्के या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते. यावेळी अनिल भुजबळ, प्रल्हाद देवघरे, पोपट वाडकर, जितेंद्र गायकवाड, सुभाष वाडकर, प्रशांत झांबरे, बाळासाहेब गायकवाड, अमोल वाडकर आदी उपस्थित होते.