कोलोंबो :- श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे येत्या 21 तारखेला दोन दिवस भारतभेटीवर येणार आहेत. श्रीलंकेतील आर्थिक संकट तीव्र झाल्यानंतर गोटाबाये राजपक्षे यांना पदावरून पायउतार व्हाववे लागले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे विक्रमसिंघे यांच्याकडे आल्यानंतर ते प्रथमच भारतभेटीवर येत आहेत.
राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी म्हणजे सप्टेंबर 2024 च्या अखेरपर्यंत विक्रमसिंघे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आपल्या दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान विक्रमसिंघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. श्रीलंकेमध्ये भारताच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या उर्जा, वीज, कृषी आणि सागरी क्षेत्राशा संबंधित विविध प्रकल्पांची निश्चिती ते या दौऱ्यादरम्यान करणार आहेत.
यासाठी त्यांच्या समवेत मत्स्यव्यवसाय मंत्री डग्लस देवानंद, उर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा, परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी आणि अध्यक्षांचे प्रमुख सगाला रत्नायके हे भारतात येणार आहेत.