पुणे – युवा उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक जिल्हा स्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुविज्ञा दोडके, परिनिधी बिवाल, अनुष्का भारद्वाज, पुर्वा सातव यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारलेल्या या मैदानात उपांत्य फेरीत २७ ते ३० वजनी गटात प्रणिती क्षीरसागरने अक्षरा काचीचा ४-१ असा तर, पुर्वा सातवने जिया खैरनारचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
U-19 Cricket : विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पराभूत झाल्यावरही आयसीसीच्या युवा संघात भारताचा डंका…
सब – ज्युनिअर ४६ ते ४९ वजनी गटात सुविज्ञा दोडकेने नक्षत्रा अंगजचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. श्रद्धा चौधरीने आर्या शेटेचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.