पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत शहरातील १६ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा आजपासून खराडी जिमखाना येथील मैदानावर होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संचालक सतिश पठारे यांनी दिली.
स्पर्धेत रिव्होल्यूशन, पूना स्पोर्ट्स, अजिंक्य क्रिकेट क्लब, किंग्ज स्पोर्ट्स क्लब, स्टार इलेव्हन, फायटर्स, सनराईज इलेव्हन, २२ यार्ड्स, सणस हॉटेल, एक्का लायन्स, पुणे क्रिकेट अकादमी, रॉयल पुरंदर, मास्टर क्रिकेट क्लब, साई क्रिकेट क्लब, ऍडलर्स, शांताराम बापू कटके या 16 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…
स्पर्धेचे सामने डे-नाईटमध्ये खेळविण्यात येणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला करंडक व १००००० रूपये, तर उपविजेत्याला करंडक व ६१००० रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, यष्टीरक्षक यांना प्रत्येकी ५००० रुपये आणि मालिकावीराला २१००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.