Schedule confirmed for ICC U19 Men’s ODI Cricket World Cup 2024 : पुरुषांच्या अंडर-19 एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेची सुरुवात यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 जानेवारीपासून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे.
आयसीसीसी (ICC)ने सोमवारी संध्याकाळी अंडर-19 ODI विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल 3 संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण 12 संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. या स्पर्धेत सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
अ गट : भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका
ब गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड
क गट : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ड गट : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ
ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशसोबत 20 जानेवारीला, दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना28 जानेवारीला अमेरिकेसोबत खेळणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.
The wait is over 🤩
Fixtures for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup in South Africa are OUT! 🗓️#U19WorldCup | More ➡️ https://t.co/IX3eV3Z5fY pic.twitter.com/glWKCQF7xJ
— ICC (@ICC) December 11, 2023
टीम इंडिया पाच वेळा चॅम्पियन…
1988 पासून अंडर-19 वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. 1998 पासून दर दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. टीम इंडिया ही अंडर-19 विश्वचषक (Under 19 World Cup) इतिहासतील सर्वात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत टीम इंडिया या स्पर्धेत पाच वेळा (2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये) चॅम्पियन बनली आहे. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये टीम इंडियाने उपविजेतेद मिळवलं होतं. ऑस्ट्रेलियाला तीनदा तर पाकिस्तानला दोनदा हे विजेतेपद मिळाले आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनीही प्रत्येकी एकदा ही ट्रॉफी जिंकली आहे.