नगर, (प्रतिनिधी)- निंबळकचे ग्रामदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी भरविलेल्या जंगी हगाम्यात नामवंत पहिलवानांनी कुस्त्यामधील डावपेज टाकत आखाडा रंगतदार केला. आठ तास हगामा रंगतदार झाला. माधवराव लामखडे गेल्या तीस वर्षापासून स्वखर्चातून हगाम्याचे आयोजन करत आहे.
ग्रामदैवत श्री खंडेरायांची यात्रा बुद्ध पौर्णिमेस असते. त्यामुळे यावर्षी यात्रा गुरुवार दि.२३ रोजी, हगामा दि. २४ रोजी हगाम्याचे आयोजन केले होते. पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रूपयापर्यत कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्त्या इतक्या रंगतदार झाल्या की, प्रेक्षकांनी मोठया प्रमाणात बक्षिसाचा वर्षाव केला. जवळपास तीनशे कुस्त्या झाल्या.
पंच म्हणून बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब साठे, साहेबराव सप्रे, अजय लामखडे, केतन लामखडे यांनी काम पाहिले. या हगाम्यात महिला पहिलवानांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली. या हगाम्यासाठी माजी आमदार नीलेश लंके, माजी जिल्हा परिषद माधवराव लामखडे ,भाऊराव गायकवाड, संजय गेरंगे, बाळू म्हस्के, दादाभाऊ कळमकर दादा कोतकर, भाऊ गोडसे, दत्ता पाटील सप्रे,
रमाकांत गाडे, योगीराज गाडे,भाऊराव गायकवाड, बी.एम. कोतकर, घनश्याम म्हस्के, विष्णू खोसे, शिवा पाटील होळकर, वसंत पवार, विष्णू खोसे, बाळासाहेब कोतकर, सतीश गवळी या हगाम्याचे नियोजन माधवराव लामखडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.