मुंबई – 3 जून 2013 रोजी जिया खानच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीच्या आईने तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर हत्येचा आरोप केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी सुरज पांचोलीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज प्रियकर सूरज पांचोलीच्या संदर्भात निकाल दिला आहे. सुरज पांचोलीची सुसाईड नोटमध्ये लावण्यात आलेल्या सर्व आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातूनही अभिनेत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जियाने आत्महत्या केल्यानंतर तिच्याकडे सापडलेली सुसाईड नोट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावरूनच तिच्याशी प्रेम संबंध असलेल्या सुरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी अनेकदा त्याला तपासासाठी बोलवले देखील होते. तब्बल दहा वर्षांनी या केसचा निकाल लागला असून आता सुरज पांचोलीची निर्दोष मुक्ताता करण्यात आली आहे.
काय झाले न्यायालयात
२० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. ज्यामध्ये सुरज पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जिया खानच्या आईने केली होती तक्रार
जिया खानची आई राबिया यांनी तिच्या वकिलामार्फत हा अर्ज दाखल केला होता. अर्जात असे म्हटले होते की प्रथमदर्शनी पुरावा मृत व्यक्तीशी संबंध असताना त्याने शाररिक व मानसिक छळ केला असल्याचे देखील तक्रारीत म्हंटले होते.