मुंबई – अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये मदतीचा हात पुढे केल्यापासून त्याने लोकांच्या हृदयात स्वतसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच कामामुळे चर्चेत असणारा सोनू सूदला आता थेट रेल्वेने ताकीद दिली आहे. नुकतंच सोनुने एक व्हिडीओ शेअर केला होता त्यावरून रेल्वेने आता त्याला चांगलेच सुनावले आहे.
सोनू सूद अनेकदा रेल्वेने प्रवास करतो. आता काही दिवसांपूर्वी सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चालत्या ट्रेमध्ये दरवाजात बसलेला दिसत आहे. त्याचे चाहते नेहमीप्रमाणे त्याचे कौतुक करताना दिसले, तर काहींना असा प्रवास करणे योग्य वाटले नाही अशा कमेंट केल्या आहेत. आता रेल्वेनेही यावर आक्षेप नोंदवला असून सोनू सूदला सल्लाही दिला आहे.
रेल्वेने सोनूचा व्हिडीओ शेअर करत असं न करण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेने सोशल मिडीआयवर लिहिले,”देशातील आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. ट्रेनच्या पायऱ्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो.”
प्रिय, @SonuSood
देश और दुनिया के लाखों लोगों के लिए आप एक आदर्श हैं। ट्रेन के पायदान पर बैठकर यात्रा करना खतरनाक है, इस प्रकार की वीडियो से आपके प्रशंसकों को गलत संदेश जा सकता है।
कृपया ऐसा न करें! सुगम एवं सुरक्षित यात्रा का आनंद उठाएं। https://t.co/lSMGdyJcMO
— Northern Railway (@RailwayNorthern) January 4, 2023
सोनू सूदने अशाप्रकारे ट्रेनमधून प्रवास केल्याची तीव्र प्रतिक्रिया मुंबई रेल्वेनेही दिली आहे. सोनूच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, GRP मुंबई रेल्वेने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर लिहिले, “फूट बोर्डवर प्रवास करणे हे चित्रपटांमध्ये ‘मनोरंजन’चे साधन असू शकते, परंतु वास्तविक जीवनात नाही ! चला सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया आणि सर्वांना ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ खात्रीपूर्वक शुभेच्छा देऊया.”