मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटातील तिच्या भूमिकेतून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनालीने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ती झळकली.
हा चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत सोनालीने सोशलवर खास पोस्ट लिहली आहे. सोनालीच्या लुकवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहे, सोनालीने तिच्या पोस्टद्वारे या चित्रपटाचा भाग असल्याबद्दल लिजो जोस पेलिसरीचे आभार मानले आहे. या चित्रपटाचे शूटिंग 130 दिवस चालले होते. याचे शूटिंग राजस्थान, चेन्नई आणि पुद्दुचेरीसह अनेक ठिकाणी सुरू आहे. ‘मलाईकोट्टाई वलिबान’ हा लिजो जोस पेलिसरीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या चित्रपटाद्वारे मोहनलाल पहिल्यांदाच लिजोसोबत काम करत आहेत.असेही तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला आहे. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटाने आतापर्यंत नेट कलेक्शन ८.४ कोटी इतके आहे. सोनालीबद्दल सांगायचे झाले, तर तिचा ‘ताराराणी’ हा आगामी चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.