बॉलिवूड कलाकार नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरून नकळत पणे ट्रोल होत असतात. सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड कलाकरांना त्यांचा पोस्टवर युजर्स कडून कधी पोस्ट साठी चांगल्या कंमनेट्स येतात तर कधी विनोदी कॉमेंट्स येत असतात. यातच आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर बुलेट चालविण्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
सोनाक्षी सिन्हाने बुलेटवर ट्रोल झाली आहे. सोनाक्षी सिन्हा बुलेटवर करीना कपूरच्या सेटवर जात असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी रहदारीच्या रस्त्यावर बुलेट चालवताना दिसत आहे. तर एक अंगरक्षकही सोनाक्षीपासून थोड्या अंतरावर तिच्यासोबत धावताना दिसतोय.
सध्या हा व्हिडियोला सोशल मीडियावर चांगलाच चर्चत आहे. काही सोशल मीडिया युजर्सने सोनाक्षीचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिच्यावर कॅमेरामन आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याबद्दल टीकाही केली आहे.
इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी सोनाक्षीला “दबंग गर्ल” आणि “बुलेट राणी” असे म्हटले, तर एकाने “तू एक प्रेरणा आहेस” अशीही प्रतिक्रीया दिली आहे. अशाप्रकारे सोनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. एकाने तर हा विनोद आहे का? असा सवालच केलाय. तसेच हे लोकांना त्रास देणारे आहे आणि तिला रहदारीच्या रस्त्यांवर बुलेट शिकता येणार नाही असेही काहीजण म्हणत आहेत.