पुणे – जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये करोनाचा कहर कमी होत असतानाचे चित्र असताना गुरुवारी सहा करोनाबाधिता आढळून आल्याने एखच खळबळ उडाली आहे. यातील जवळपास सर्वच बाधित बाहेरगावचे आहे. त्यामुळे बाहेरगावावरून आलेले पुन्हा एकदा जिल्हासाठी डोकेदुखी ठरणार की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
बाहेर गावारून आलेले अनेक जण होम क्वारंटाइन असताना करोनाबाधित आढळून येत असल्याने ते जास्त लोकांच्या संपर्कात येत नसल्याने ही बाब दिलासा देणारी आहे. तरी सोशल डिस्टन्सिंगसह शासनाच्या नियामांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.