राहू, (वार्ताहर)– दौंड तालुक्यातील कोरेगाव भिवर संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री संजय शुक्ल यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बेनके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुनील वरपे, उपाध्यक्ष सुरेश काळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी प्रकाश शितोळे यांनी जाहीर केले. त्यांना सहाय्यक म्हणून सचिव रामदास झाडगे व सहायक सचिव भाऊ ठाकुर यांनी काम पाहिले.
यावेळी कोरेगाव भिवरचे माजी सरपंच बन्सी फडतरे, माजी सरपंच गुलाब लवंगे, माजी चेअरमन मधुकर सोनवणे, माजी सरपंच सोमनाथ काळे, पोलीस पाटील बाळासाहेब मांजरे, माजी चेअरमन भरत काळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष कैलास बेनके व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.