लोकनेते बाळासाहेब देसाई पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सणबूर – लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनेतेत्यांच्या पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच कारखाना कार्यस्थळावरील देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई यांचे समाधीस्थळावर पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.
दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 39 व्या पुण्यतिथीनिमित्त गत बारा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे तेरावे वर्ष होते. या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.
या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये नामदार शंभूराज देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, ईश्वरी देसाई, चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. तर ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज पापर्डेकर, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई पापर्डेकर, अमित लोहार, सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.
शनिवार दि. 23 रोजी बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी सोहळा पार पडला यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळा व स्व.शिवाजीराव देसाई यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेब यांचे 39 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.