आगामी चित्रपट “बंटी और बबली 2’च्या एका गाण्यासह या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि डेब्यू अभिनेत्री शरवरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर करण्यात आलेल्या शूटिंगबाबत सैफ अली खान म्हणाला, शूटिंगच्या दरम्यान विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सध्याची वेळ ही खूपच संवेदनशील आहे. अभिनेता, निर्मातासमवेत संपूर्ण टीमला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागणार आहे; परंतु या सुविधांमध्येही शूटिंग करण्याचा अनुभव खूपच चांगला राहिला. विशेष, म्हणजे घराच्या तुलनेत सेटवर आम्हाला जास्त सुरक्षितता वाटले.
2005 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील बबलीची भूमिका साकारणारी राणी जुन्या आठवणींमुळे भावुक झाली होती. राणी म्हणाली, शूटिंग करताना आमचा वेळ खूपच छान गेला. करोनाच्या काळात मला शूटिंगच्या पूर्वींच्या दिवसांची आठवण झाली.
यशराज फिल्म्स प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही. शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र, सध्या चित्रपटगृहे बंद असल्याने निर्मात्यांना चित्रपटगृह सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.