लखनोै – शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पक्षाने अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाशी आघाडी केली असून या आघाडीत शिवपाल यादव यांच्या पक्षाला सहा जागा देण्यात आल्या आहेत.
दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार या राज्यातील गुनौर, भोजपुर, जसराना, मुबारकपुर, गाझीपुर, जसवंतनगर अशा सहा जागा शिवपाल यादव यांचा पक्ष लढवणार आहे. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने यातील एकही जागा जिंकली नव्हती.
तेथे आता हा पक्ष आपले नशीब अजामावणार आहे. शिवपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. कौटुंबिक व राजकीय वादातून काही वर्षांपुर्वी त्यांनी समाजवादी पक्षाशी फारकत घेऊन स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला होता. पण यावेळी अखिलेश यांनी आपल्या काकांशी मिळते जुळते घेत त्यांना आपल्या पक्षाच्या आघाडीत स्थान दिले आहे.