पौड – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवमान करणारे आणि शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याकडे दिले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, संघटक स्वाती ढमाले, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, शिवसेनेचे नेते आबासाहेब शेळके, कैलास मारणे, माजी तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ, सुरेश मारणे, शिवसहकार सेनेचे तालुका
अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, दिलीप गुरव, कांता पांढरे, सुरेखा तोंडे, नागेश साखरे, तुषार पवळे, तालुका अधिकारी राम गवारे, उपतालुका प्रमुख पांडुरंग निवेकर, वैभव पवळे, नरेश भरम, सरपंच सुनील वायकर, विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.