Jambut News : शिरूरच्या बेट भागात दहावीच्या निकालाचा गुलाल; चांडोहची शाळा १०० टक्क्यांवर, तर पिंपरखेड आणि जांबूतमध्ये विद्यार्थ्यांची बाजी
Jambut News : शिरूर तालुक्यातील चांडोह, पिंपरखेड आणि जांबूत येथील माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

Jambut News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात शिरूर तालुक्यातील बेट भागातील शाळांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जांबूत, पिंपरखेड आणि चांडोह परिसरातील शाळांचा निकाल उत्तुंग लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. (Jambut News)
चांडोह येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. पिंपरखेड येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.७८ टक्के तर जांबूत येथील जय मल्हार हायस्कूलचा निकाल ९७.५४ टक्के एवढा लागला आहे. (Jambut News)
प्रथम पाच क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे
बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांडोह
१. कु.ओम तुकाराम रोकडे ( ८५.४०)
२. दीपिका बजरंग वळसे (७८.६०)
३. वैष्णव धनेश शिंदे (७४.४०)
४. भारती नवनाथ शिंदे (७४.२०)
५. समीक्षा पांडुरंग मेसे (७३.८०)
श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड
१. संस्कृती संतोष पानमंद (९८.४०)
२. सुदर्शनी ज्ञानेश्वर ढगे (९६.८०)
३. अनुष्का विकास शिंदे (९५.००)
४. समृद्धी अनिल पिंपळे (९४.४०)
५. तन्वी किरण ढोमे (९३.८०)
जय मल्हार हायस्कूल जांबूत
१. अक्षदा विकास कवडे व प्रिया वासुदेव होले (९३.८०)
२. आर्यन योगेश पावडे (९३.४०)
३. पांचाली सुनील देवाडे (९०.८०)
४. विवेक दत्तात्रय सरोदे (९०.४०)
५. दिव्या योगेश जोरी (८९.८०)
कौतुकाचा वर्षाव
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शिरूर तालुक्यातून आणि बेट परिसरातून मोठे अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मिळवलेल्या या यशामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





