HSC Result 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात शिरूर तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण तालुक्याचा निकाल ९२.४९ टक्के लागला असून, तालुक्यातील तब्बल १२ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. यंदा शिरूर तालुक्यातून एकूण ५ हजार ८२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ५ हजार ३८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाने – विद्याधाम प्रशाला, शिरूर, विद्याधाम उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाई, श्री दत्त विद्यालय, पिंपरखेड, कै. आर. जी. पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज, मुखई, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सणसवाडी, स्वातंत्र्य सेनानी कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे हिवरे, कालिकामाता विद्यालय, वाघाळे, श्री गुरुदेव दत्त विद्यालय, सविंदणे, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल, शिक्रापूर, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, तळेगाव ढमढेरे, न्यू व्हिजन ज्युनिअर कॉलेज, शिरूर, श्री भैरवनाथ विद्यालय, करडे. इतर प्रमुख शाळांचा निकाल (टक्केवारी): चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर ८५.९५ टक्के, विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर ७९.२८ टक्के, भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ ८८.६२ टक्के, आर. बी. गुजर प्रशाला, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. तळेगाव ढमढेरे ९१.१३ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर ८४.९४ टक्के, छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रासाई ६३.८२ टक्के, श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे ९८.६५ टक्के, सरदार रघुनाथ ढवळे विद्यालय, केंदूर ९२.१० टक्के, बापूसाहेब गावडे ज्यू.कॉलेज, टाकळी हाजी ९२.२२ टक्के, विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी ७५ टक्के, वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा ८३.६८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल मलठण ८४.६१ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, कवठे यमाई ८३.३३ टक्के, श्री संभाजीराजे ज्यू. कॉलेज, जातेगाव बुद्रुक ९९.१० टक्के, श्री छत्रपती संभाजी हायस्कूल, कोरेगाव भीमा ८० टक्के, सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड ज्यू. कॉलेज, कासारी ९४ टक्के, विद्यानिकेतन ज्यु. कॉलेज, कोंढापुरी ८४.३३ टक्के, समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय, तळेगाव ढमढेरे ९०.६२ टक्के, विद्या विकास मंदिर, करंदी ९७.५० टक्के, सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेज, शिरूर ९२.८५ टक्के, विजयमाला ज्यू. कॉलेज, शिरूर ९८.६५ टक्के, श्री महागणपती ज्युनिअर कॉलेज, रांजणगाव गणपती ८४.९३ टक्के, ग्लोरी ज्यु.कॉलेज, कोरेगाव भीमा ९८.१८ टक्के, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आलेगाव पागा ९२.१० टक्के, आदर्श विद्यालय, वरुडे ९५टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, इनामगाव ०० टक्के, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर ९६.७८ टक्के, श्री वसंतराव डावखरे मेमोरियल ज्यू. कॉलेज शिरूर ९९.३१ टक्के, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कारेगाव ९४.४८ टक्के. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्यांचे आणि शिक्षकांचे तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.