नारा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर पश्चिम जपानमधील नारा येथे गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान, त्यांचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोराला पकडण्यात यश आलं असून त्याची ओळख पटली आहे. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव तेत्सुया यमगमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
शहरात भाषण करताना माजी पंतप्रधानांना गोळी मारल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.29 वाजता) घडली. पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे की, 67 वर्षीय अबे जपानच्या नारा शहरातील रस्त्यावर भाषण देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणारा शूटर तेत्सुया यमगमी स्थानिक व्यक्ती आहे. रिपोर्ट्सनुसार 41 वर्षीय शूटर तेत्सुया यमगमी हा जपानच्या मिलिट्रीमध्ये होता. त्यानं जपानच्या नौदलात सेवा बजावली आहे. तेत्सुया यमगमीनं ज्यावेळी शिंजे ओबे यांच्यावर फायरिंग केली त्यावेळी त्या दोघांमधील अंतर केवळ 10 फुटांचे होते.
शिंजो आबे यांना गोळी लागल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी लगेच तेत्सुया यमगमीला पकडलं. रिपोट्सनुसार तेत्सुया यमगमीनं शॉटगनचा वापर केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.