मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक चित्रपटांत वेगवेळया भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या तिच्या आगामी ‘सुखी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. तिचा हा चित्रपट देखील स्त्रींवर भाष्य करणारा आहे. पोस्टरसह या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.
शिल्पा शेट्टीने ‘सुखी’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “ही गोष्ट आहे माझी, तुमची आणि आपल्या सर्वांची. तुमच्यासारख्याच कालरा म्हणजे सुखीला नक्की भेटा…22 सप्टेंबरला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार “सुखी”. ‘सुखी’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सुखी’ ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. या चित्रपटात पंजाबी गृहिणी ‘सुखी’ अर्थात कालरा आणि तिच्या मैत्रिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘सुखी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी करत आहे. तर त्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा करत आहेत. या चित्रपटात शिल्पा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 22 सप्टेंबर 2023 रोजी ‘सुखी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी देखील ‘सुखी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. ज्यात शिल्पा शेट्टीचा अनोखा लुक पाहायला मिळत आहे. यात शिल्पा शेट्टीच्या एका हातात लाटणे, इस्त्री अशा वस्तू दिसत आहे. तर तिच्या दुसऱ्या हातात पाकिट, डब्बा, घड्याळ अशा वस्तू पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरु आहेत,असे दाखवण्यात आले आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर अनेकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.