वालचंदनगर -जंक्शन- शेळगाव (ता. इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी म्हसू रामा शिंदे व राहुल रावसाहेब निंबाळकर (दोघे रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गेल्या चार महिन्यांपासून शेळगाव तसेच सासवडजवळ डोंगर भागात पीडित मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत.
गुरुवारी (दि. 16) पीडित मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने दुचाकीवरून तिला पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप करीत आहेत.