Sharvari Wagh – बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ‘शर्वरी वाघ’ (Sharvari Wagh) हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.
2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी (Sharvari Wagh) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.
शर्वरी वाघ (Sharvari Wagh) बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत असून, तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरीने पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच शर्वरीने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी तिने काळ्या आणि पांढर्या रंगाचे चेक आकर्षक साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधलं. या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत होती.
शर्वरीचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना वेड लावत आहेत. या फोटोंवर शर्वरीला खूप कमेंट्स-लाईक्स मिळत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा लाखोंचा घरात चाहता वर्ग आहे.