पुसेगाव, (प्रतिनिधी) – येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचा 60 वा वर्धापनदिन विविध शाखांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व व्यवसायाभिमुख शिक्षण देणारी ही जिल्ह्यातील नामांकित संस्था आहे. पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल अँड जुनियर कॉलेज,
इंदिरा गांधी कन्या प्रशाला, श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळा, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल, राजापूर हायस्कूल, रणसिंगवाडी येथील भैरवनाथ हायस्कूल, जाखणगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व जांब हायस्कूल येथे संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्याची महती सांगितली.
पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल अँड जुनियर कॉलेज व एचएससी व्होकेशनल विभाग येथील कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव, खजिनदार लक्ष्मणराव जाधव, विश्वस्त योगेशराव देशमुख, एस. आर. पाटील, सदस्य जयंतराव जाधव उपस्थित होते.
अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून, संस्थेच्या शाखांमध्ये आदर्श विद्यार्थी घडत आहेत. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असणारे मान्यवरांनी सांगितले.