पुणे – डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे.
बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या (पदविका) थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. डिप्लोमाची प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.
मात्र, मराठा आरक्षणाच्या निर्णयास स्थगिती दिल्याने तंत्रशिक्षणच्या अखत्यारितील सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया स्थगित झाली होती. आता राज्य शासनाने मराठा आरक्षणास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे.
तंत्रशिक्षण विभागाने डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचे दोन फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिली फेरीस 11 डिसेंबर, तर दुसरी फेरी 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची संस्थांना 7 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
जागा जाहीर करणे – 11 डिसेंबर
विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम भरणे व निश्चित करणे – 12 ते 14 डिसेंबर
पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप – 16 डिसेंबर
कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे – 17 व 18 डिसेंबर
कागदपत्र सादर करून प्रवेशनिश्चिती करणे – 17 ते 19 डिसेंबर
दुसरी प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करणे – 20 डिसेंबर