सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा परिषद आर्थिक सहाय्य पतसंस्थेत दि. १ एप्रिलपासून ठेववाढ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मुदत ठेवीवरील व्याजाचा दर ८.५० टक्के लागू करण्यात आला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी, बिगर सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. प्रशांत भोइटे, व्हा. चेअरमन अविनाश कवळे यांनी केले आहे.
सातारा जि. प. आर्थिक सहकारी सहाय्य संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्था इमारतीसाठी जागा खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संचालक मंडळाच्यावतीने पावले उचलण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी ही संस्था अल्प व्याजदरात जलद कर्ज देत असून संस्था सभासदांना नियमितपणे संस्था लाभांश देत आहे.
संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कर्ज असलेली योजना, सभासदांची सुरक्षा ठेव योजना राबवण्यात येत आहे. सध्या संस्थेत ठेव वाढ अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत व्याजाचा दर ८.५० टक्के लागू करण्यात आल्याचे डॉ. भोइटे व कवळे यांनी सांगितले.