सर्व वयोगटातील 600 स्पर्धक धावले; डॉक्टरांच्या संघटनेकडून यशस्वी आयोजन
सातारा – येथील नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेमार्फत छत्रपती शाहू क्रीडा संकुलापासून आयोजित करण्यात आलेल्या दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर निमा मॅरेथॉन 2023 या स्पर्धेला सातारकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेसाठी 600 स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रमुख अतिथी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे हस्ते या दोन्ही मॅरेथॉन स्पर्धेचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी साताऱ्यातील पहिल्या महिला कॉम्रेड रनर डॉ. अश्विनी देव,जिल्हा विधी व न्याय अधिकारी राजेश पेनुरकर साहेब, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर अंतरामध्ये डॉक्टरांच्या गटामध्ये 18 ते 30 वर्षे वयोगटात डॉ. जयंत भिंगारदिवे, 31 ते 40 वयोगटात डॉ. अमोल पवार, 41 ते 50 वयोगटात डॉ. दत्तात्रय तावरे, 51 व त्या पुढील वयोगटात डॉ. विकास फरांदे हे विजेते ठरले महिलांच्या गटात 18 ते 30 वर्षे वयाच्या गटांमध्ये डॉ. स्नेहल शिवथरे, 31 ते 40 वर्षे वयोगटात डॉ. गीता शिंदे, 41 ते 50 वर्षे वयोगटात डॉ. आरती मावशी,
51 व त्या पुढील वयोगटात डॉ. नीलिमा वनारसे या विजेत्या ठरल्या. डॉक्टरांव्यतिरिक्त सर्वसामान्य धावपटूंच्या गटामध्ये 18 ते 30 वर्षे वयोगटात शिवम कापले,31 ते 40 वयोगटात योगेश जाधव, 41 ते 50 वर्षे वयोगटात विजय भिलारे, 51 व त्यावरील वयोगटात विठ्ठल आरगडे हे विजेते ठरले. तर महिलांच्या गटात 18 ते 30 वर्षे वयोगटात स्वाती साळुंखे, 31 ते 40 वर्षे वयोगटात दिपाली कीर्तने, 41 ते 50 वयोगटात स्मिता शिंदे, 51 आणि त्यावरील वयोगटात शशिकांत घोरपडे हे विजेते ठरले. या सर्व विजेत्यांचा सत्कार प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, सचिव डॉ. विश्वजीत बाबर, खजिनदार डॉ. सुधाकर लाड, उपाध्यक्ष डॉ. संजय नलावडे, सहाय्यक सचिव डॉ. पवन गायकवाड, डॉ. संकेत शिरसाट, सहाय्यक खजिनदार डॉ. संदीप कोरडे, संचालक डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. माणिक जाधव, डॉ. मनीष कुमार जंगम, डॉ. मनोहर ससाणे, डॉ. अभिराम पेंढारकर, डॉ. संजय यादव, डॉ.अभिजीत मायने, डॉ. मंजुषा पवार, डॉ. उर्मिला शिंगटे, डॉ. महेश जाधव, डॉ. दीपक माने ,
डॉ. महेश पवार राज्यस्तरावरील प्रतिनिधी डॉ. सुजित बेंद्रे, डॉ. संदीप निकम, डॉ. ऋतुराज देशमुख, डॉ.आशिष जरग, डॉ.रविराज निकम संस्थापक संचालक डॉ. सुधाकर बेंद्रे व डॉ. माणिक जाधव, मॅरेथॉन स्पर्धेचे संचालक डॉ. सुधीर पवार व डॉ. शुभांगी गायकवाड, प्रशिक्षक व मार्गदर्शक डॉ. दयानंद घाडगे, डॉ. सुनिता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.