सातारा – येथील कल्याणी ग्रुप आणि सातारा रंगकर्मी ग्रुपच्यावतीने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धेत पुणे येथील एसपीएम इंग्लिश स्कूलच्या ‘हायजॅक’ या एकांकिकेने ‘नटखट’ करंडक पटकवला.
शाहू कला मंदिरात झालेल्या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सातारा येथील 18 संघ सहभागी झाले होते. भाजपचे नेते दत्ताजी थोरात, सागर पावशे, सुधीर ठोके, अमित कुलकर्णी, बाळासाहेब खरात, देवदत्त राजमाने, अमोल सणस, मंगेश वाडेकर, मिलिंद टंकसाळे, धोंडिबा कारंडे, प्रसाद नारकर, हेरंब जोशी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. अमोल सणस यांनी स्पर्धेच्या नेटक्या नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. ही स्पर्धा विस्तारण्यासाठी सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सातारा रंगकर्मी आणि देणगीदारांमुळे स्पर्धेचे नियोजन करणे शक्य झाल्याचे मुख्य संयोजक कल्याण राक्षे यांनी प्रास्ताविकात सांगितले. शशांक लिमये आणि समीर पंडितराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नितीन देशमाने यांनी निकाल वाचन केले. रविना गोगावले आणि प्रकाश बोधे यांनी संघनोंदणी व व्यवस्था पाहिली. प्रा. डॉ. सुजीत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देशमुख यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – सांघिक – एसपीएम स्कूल, पुणे (हायजॅक, प्रथम), नाट्यसंकुल, पुणे (कठपुतली, द्वितीय), देवल क्लब, कोल्हापूर (राखेतून उडाला मोर, तृतीय), बालगड रंगभूमी, पुणे (पंचक पिंटू, चतुर्थ), वैयक्तिक विजेते – पुरुष अभिनय – आरव गुळवणी (देवल क्लब, प्रथम), पार्थ कोकीळ ( नाट्यसंकुल, द्वितीय), आर्यश भारती (बालगड, तृतीय), स्त्री अभिनय – इरा जोशी (एसपीएम स्कूल, प्रथम), सावनी दाते (क ख ग, पुणे, अष्टभुजा, द्वितीय), अंतरा पाटील (ट्री थिएटर, विद्यालय, तृतीय), अभिनय उत्तेजनार्थ – अवनीश कुमठेकर (क्रांतिसूर्य), आरोह गोसावी (ब्रँड फॅक्टरी), आर्वी चाणेकर (शेरखानला वाचवा), शरण्या पवार (चम चम चमको), वज्र पवार (जम्बा बंबा बू), शर्वरी घडवई (थेंबाचे टपाल), सारंग सोनुले (गाढव कुठला),
यशवंत वोशिंगे (तार्यांना लागले ग्रहण), जिजा वालकर (अस्तित्व), शर्व दाते (जीर्णोद्धार), नेपथ्य – अनमोल, वैदेही (एसपीएम स्कूल, प्रथम), संतोष, राकेश पाटील (ट्री थिएटर, पुणे, विद्यालय, द्वितीय), दिग्दर्शन – अनमोल देशपांडे, वैदेही गोडबोले (एसपीएम स्कूल, प्रथम), संध्या कुलकर्णी (नाट्यसंकुल, द्वितीय), रंगभूषा व वेशभूषा – मयुरी माकुडे (क ख ग, प्रथम), अवधूत (देवल क्लब, द्वितीय), संगीत – नहुष ढवळीकर (नाट्यसंकुल, प्रथम), अनमोल, अवधूत (एसपीएम स्कूल, द्वितीय), प्रकाश योजना – शाम चव्हाण, चेतन ढवळे (एसपीएम स्कूल, प्रथम), प्रसाद कुलकर्णी (नाट्यसंकुल, द्वितीय).