ठोसेघर – सातारा शहरातील सर्वात जुनी व्यायामशाळा म्हणून ओळख असलेल्या महात्मा गांधी क्रीडा मंडळाचा तिसावा वार्षिक क्रीडा सप्ताह नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्पर्धेमधील विविध क्रीडा प्रकारातील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक) जोर मारणे : सुजल निकम, अपूर्व नारकर, अभय सावंत. गोळाफेक : साई गेजगे, विकास खरात, चिन्मय पवार. बैठका मारणे : प्रणव कणके, अभय सावंत, शिवम खुळपे. थाळीफेक : सागर महापुरे, स्वप्निल कदम, रोशन कदम. डबलबार मारणे : करण गायकवाड, किरण काकडे, त्रिकाल कदम.
डिप्स मारणे : करण गायकवाड, किरण काकडे, त्रिकाल कदम, सिंगल बार : करण गायकवाड, साई गेजगे, यश सागवेकर, भालाफेक ः स्वप्नील कदम, सागर महापुरे, साई गेजगे. पॉवर लिफ्टिंग : साद बागवान, नवनाथ झोरे, सिद्धेश काटकर. ज्युनियर महात्मा श्री २०२४ : साद बागवान, मोहित सागर, गुरु गेजगे, सिनियर महात्मा श्री २०२४ : त्रिकाल कदम, अपूर्व नारकर, सुधीर जायगुडे.
या सर्व विजेत्या स्पर्धकांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, या स्पर्धेचा बक्षीस समारंभ २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर पार पडला. प्रदीप गोळे, दीपक कुलकर्णी, राजेश जाधव, इब्राहिम बागवान, बाळासाहेब कुलकर्णी, सुनील अष्टेकर आदींनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.