सातारा – ब्रेन ब्राऊजर अॅबॅकस अॅड वेदिक मॅथस् या संस्थेमार्फत पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्याअॅबॅकस स्पर्धेत अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता तिसरीमधील ज्ञानेश विक्रमसिह सावंत याने प्रथम क्रमांक मिळवला. ऑल राऊंडर ब्रेस्ट स्टूडंट अॅवॉर्डचा तो मानकरी ठरला आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या चाचणीसाठी अतिशय महत्त्वाची समजली जाते. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये ज्ञानेश सावंत याचे प्रतिस्पर्धी वयाने आणि शिक्षणानेही मोठे होते. मात्र ज्ञानेशने आपल्या बौद्धिक चातुर्याची ओळख दाखवत या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेच्या दिमाखदार झालेल्या बक्षीस समारंभात राष्ट्रवादीच्या हडपसर विधानसभा अध्यक्षा वंदना मोडक यांच्या हस्ते ज्ञानेशला टॅब व ब्रेस्ट स्टूडंट ऍवॉर्डची ट्रॉफी देण्यात आली. यावेळी सौ. सुधा हरपळे, गणेश ढोरे, संजय हरवळे, सौ. नीलम साळवे, नितीन साळवे उपस्थित होते. ज्ञानेशच्या या यशाबद्दल अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक अजित साळुंखे यांनी त्याचे अभिनंदन करून सत्कार केला.
ज्ञानेशच्या यशाबद्दल कल्याणराव महाडिक, हणमंत पवार, अंकुश महाडिक, प्रकाश महाडिक, दशरथ महाडिक, रणजीत सावंत, विनित जवळकर, वैभव पवार, सुधीर जाधव, चंद्रकांत सणस, निर्मला जवळकर, वसंत जवळकर, उषा सावंत, वर्षा पवार, तेजश्री सावंत, पलाश जवळकर, योगेश देवकर, मंगेश शिंदे, पंढरीनाथ पवार, दीपक देवकर, योगेश शिंदे मित्रसमूह व मान्यवरांनी अभिनंदन केले. समर्थ क्लासेसच्या सौ. निशा लोहार आणि प्राची जवळकर यांनी ज्ञानेशला बहुमोल मार्गदर्शन केले.