सातारा – जिल्ह्यात काल (दि. 2) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 560 नागरिक करोनाबाधित झाले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 167 जणांना शुक्रवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. जिल्ह्यात सलग तीन दिवस मृतांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजपर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – फलटण 124 (35164), खटाव 115 (24471), सातारा 89 (49567), कराड 78 (38089), कोरेगाव 62 (21178), माण 39 (21178), खंडाळा 19 (13866), पाटण 13 (9981),
वाई 11 (15411), जावळी 4 (9830), महाबळेश्वर 0 (4590) व इतर 6 (1924), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 41 हजार 107 करोनाबाधित आहेत. गेल्या 24 तासांमध्ये वाई तालुक्यात एका बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सहा हजार 59 करोनाबळींची नोंद झाली आहे.