आणखी 480 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 12 बाधित रुग्णांचा मृत्यू
सातारा -जिल्ह्यात काल (रविवार, दि. 22) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 480 नागरिकांना करोनाची बाधा र्झाली असून, गेल्या 24 तासांत 12 रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार 578 नागरिकांनी करोनावर मात केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली. दरम्यान, बाधितांची आणि मृतांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजअखेर बाधितांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 128 (48425), फलटण 117 (33896), कोरेगाव 54 (20487), कराड 41 (37373), खटाव 41 (23701), वाई 35 (15182), माण 22 (16398), खंडाळा 21 (13689), जावळी 8 (9739), पाटण 6 (9876), महाबळेश्वर 2 (4563) व इतर 5 (1838), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 35 हजार 167 करोनाबाधित आहेत.
गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजअखेर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – कराड 3 (1134), फलटण 2 (637), सातारा 2 (1418), खंडाळा 2 (181), कोरेगाव 2 (444), माण 1 (357), जावळी 0 (208), खटाव 0 (578), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (356), वाई 0 (351) व इतर 0(75), असे आजपर्यंत एकूण पाच हजार 827 करोनाबळी झाले आहेत.
1578 जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 1578 जणांना सोमवारी घरी सोडण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.