मुंबई -साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये विजय देवराकोंडाच्या वाढदिवसाचा साजरा केला जात आहे, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये समंथा रुथ प्रभू बुरखा घातलेली दिसत आहे.
#VijayDeverakonda Birthday Celebration at #Kushi sets pic.twitter.com/zA8LWbXT50
— Hourly Vijay Deverakonda (@HourlyDVS) May 9, 2023
समंथा रुथ प्रभूला बुरख्यात पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओ आगामी चित्रपटाच्या सेटवरील आहे, समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा लवकरच कुशीमध्ये एकत्र दिसणार आहेत. सामंथाचा हा लूक तिच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजय देवरकोंडा यांनी कुशीच्या सेटवर त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि समंथा रुथ प्रभूने हॅपी बर्थडे गाणे गाऊन हा वाढदिवस आणखी खास बनवला. व्हिडिओमध्ये समंथा बुरख्याखाली पिवळा सूट घातला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री वाढदिवसाचे एक आनंदी गाणे गात आहे. दरम्यान तिच्या लुकवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.